स्मार्ट फोन आणि मी
स्मार्ट फोन आणी आपण
आजकाल स्मार्टफोन ही निव्वळ श्रीमंताचा हातातील गोष्ट राहीली नाहीये .आता स्मार्टफोन सामान्याचा हातातील गोष्ट आहे . या स्मार्ट फोनचा वापर अनेक प्रकारे करता येतो . माञ आपण त्यापैकी किती प्रकारे करतो हे ज्याने त्याने स्वत:हून ठरवावे . स्मार्टफोन मधे आपण कोणती अँप वापरतो हे यासाठी बघणे अत्यंत आवश्यक आहे . निव्वळ सोशल मिडीया शी संबिधीत अशी अँप म्हणजे व्हॉयबर व्हॉटसप सारखी अँप वापरणेच म्हणजेच स्मार्टफोन वापरणे अशे नव्हे . अनेक अभ्यासपुरक अँप आहेत त्याचा वापर करून आपली प्रगती करू शकतो. अनोळख्या ठिकाणी अन्य कोणाला काही विचारण्यापेक्षा त्या त्या शहराचे अँप बघून आपण कुठेहि फिरु शकतो . तसेच आपण मनोरंजन सुध्दा करू शकतो . आपण कुठे प्रवासात अशलो तर आपली गाडी उशीरा आहे का ? किंवा आपल्या इच्छीत स्थळी जाण्यासाठी कोणकोणत्या गाड्या आहेत याची माहिती आपण घेवू शकतो . तसेच बँकेचे व्यवहार सुध्दा आपण स्मार्टफोनच्या माध्यामातून करू शकतो . आपण स्मार्टफोन वरुन MS OFFICE पण वापरू शकतो .थोडक्यात कॉम्प्यूटर वरुन करता येणारे सर्व कार्य स्मार्टफोन वरून करता येवू शकतात .माञ आधी सांगीतल्याप्रम्णे आपण याचा किती वापर करतो हे महत्वाचे आहेया विषयी खुप काही बोलता येवू शकते माञ मला 17आॉगस्टला पहाटे नाशिकहून मुंबईत जायचे असल्याने तूर्तास थांबतो .
आपला अजिंक्य तरटे
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा