पोस्ट्स

ON SPECIAL DAY लेबलसह पोस्ट दाखवत आहे

जागतिक कृषी पर्यटन दिना निमित्य

इमेज
जागतिक कृषी पर्यटन दिना निमित्य फिरायला कोणाला आवडत नाही ? आपल्यापैकी प्रत्येकजण कधीना कधी फिरायला गेलेला असतोच . कोणी धार्मिक दृष्टीने पुण्यसंचय करण्यसाठी  फिरतो . कोणी नविन अनुभव घेण्यासाठी फिरतो .कोणी स्वतःचे आरोग्य निरोगी राहावे , मन उठ्याहित राहावे म्हणून फिरतो . या विविध ऊद्देशातून त्याचे विविध प्रकार पडतात उदा वैद्यकीय पर्यटन , दुर्गभ्रमंती पर्यटन ,धार्मिक पर्यटन , यातीलच एक म्हणजे कृषी पर्यटन हा होय . याची जगात विविध भागात प्रकारे व्याख्या केली जाते .  या सर्व व्याख्यांचा सार काढल्यांस आपणास असे म्हणावे लागते की निसर्गासी साधात्म्य साधाणारे पर्यटन म्हणजे कृषी पर्यटन होय  आपल्या भारतात जवळजवळ 65% भाग ग्रामीण आहे . आपल्या भारताची खरी ओळख होते ती ग्रामीण भागातून या ग्रामीण जिवनाची ओळख करुन घेण्यासाठी केले जाणारे पर्यटन म्हणजे कृषी पर्यटन .. तर या ग्रामीण भारतासाठी केले जाणारे कृषी पर्यटन जगाला समजावे म्हणून एका विशेष मोहिमे अंतर्गत Agri Tourism  Development cooperation  ( ATDC )या संस्थेमार्फत ईसवी सन 2008पासून साजरा करण्यात येणारा दिवस म्हणजे जागतिक कृ...

जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्याने

इमेज
आज २३ एप्रिल अर्थात जागतिक पुस्तक दिन इंग्रजी साहित्यातील एक महान साहित्यीक शेक्सपियर  याचा स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो आज या साहित्यकाराची जयंती(Birth anniversary ) आणी पुण्यस्मरण (Death anniversary )दिवस सुध्दा आज पुस्तकाचे विश्व खुप मोठ्या प्रमाणात विस्तारले आहे अॉडीयो बूक ई बुक्स किंवा पारंपारिक छापील पुस्तके आदी प्रकारात सध्या  सध्या पुस्तके वाचायला उपल्बध आहेत पुर्वी न चर्चिल्या गेलेल्या अनेक विषयावर सध्या पूस्तके निघत आहेत मराठीच्या संदर्भात बोलायचे झाल्यास नॉनफिक्शन (मराठीत ज्याला ललीत साहित्य म्हणतात) पुस्तकांचे विश्व फिक्शन  ( मराठीत ज्याला वाङमय साहित्य म्हणतात )पुस्तकांपेक्षा अधिक प्रमाणात विस्तारत आहे मराठीत अॉडीयो बुक हा प्रकार अजून तरी फारसा प्रचलीत नाही असे माझे निरीक्षण आहे माझे निरीक्षण परीपूर्ण असेलच असे नाही त्याच प्रमाणे ईबुक हा प्रकार सुध्दा मराठीत स्थिरावतो आहे पुस्तकांचे विश्व खरोखरच अनभूत आहे त्यातील मजा औरच आहे अनेक प्रसिध्द व्यक्तीनी त्याचा वाटचालीत पुस्तकांचे महत्व सांगितलेलच आहे  तर पुन्हा एकदा जागतिक पुस्तक दिनाचा शुभेच्छा दे...

जागतिक वन दिवसाच्या निमित्याने

जागतिक वन दिवसाच्या निमित्याने सध्याच्या प्रचंड तापमानाच्या काळात आपणास एकच चर्चा ऐकू येते झाडे लावली पाहिजेत झाडे लावली पाहिजेत . झाडांमुळे पर्यावरणाचा समतोल टिकतो पर्यायाने हवेत गारवा टिकून रहातो ही या मागची कल्पना आहे . मानवास हे वृक्षांचे महत्व फार आधीच समजले होते . त्या अनूषंगाने मानवाने पाउले देखील टाकण्यास सुरवात केली होती . त्याचीच फलनिष्पती म्हणजे जागतिक वन दिवस . जो आपण 21 मार्च रोजी साजरा करतो . मानवी आयुष्यात वनांचे महत्व किती आहे हे आपणास तुकोबाराय आदी संताच्या अभंगातून लक्षात येतेच . संतांनी सांगितलेले हे  वृक्षांचे महत्व  आपण अनूभवू पण शकतो उदाहरणार्थ महाराष्ट्रातील महत्तवाची समजणारी जाणारी पुणे आणि नाशिक ही शहरं घेयुया  पुणे आणि नाशिक दोन्ही समान शहरे किंबहूना पुणे अधिक जलदचं या दोन्ही शहरातून फेरफटका मारल्यास आपणास काय जाणवते ? नाशकात आपणास अधिक उन जाणवते त्या तूलनेत पुण्यात उन कमी जाणवते  पुणे अधिक प्रमाणात  ग्रीन हाउस गँसेसचे उत्सर्जन करत असून देखील आपणास हा फरक जाणवतो  . याचा मागचा कारणाचा शोध घेतला असता आपणास दिसते की पुण्याच्या आ...

विषवदिन विशेष

21 मार्चच्या अनुषंगाने समसमान आम्ही दोघे म्हणती दिन राञ पृथ्वी सुर्या भोवती फिरते  हे आता जगमान्य झाले आहे . याचा आपल्याला दिसणारे दृश्यपरिणाम म्हणजे आपल्याला दिसणारे सुर्याचा उदयाचे रोज बदणारे स्थान .  धोबळ मनाने आपण सूर्य पुर्वेला उगवतो असे मानतो पण शास्ञीय दृष्ट्या विचार केला असता वर्षातील फक्त दोन दिवस असे असतात ज्या दिवशी सुर्य वास्तविक पुर्व दिशेला उगवतो . अन्य दिवशी तो वास्तविक पुर्व दिशेपासून काहि अंश उजवीकडे अथवा डावीकडे उगवतो .ते दोन दिवस म्हणजे 21 मार्च आणि 22 सप्टेंबर .            सुर्याभोवती पृथ्वी फिरत असल्यामुळे आपणास सुर्यच फिरत  आहे असे वाटते .आपण त्यास सुर्याचे भासमान भ्रमण म्हणू या . तर हे सुर्याचे भासमान भ्रमण  होते  पृथ्वीवरच्या मध्यापासून अर्थात  विषवृतापासून उजवीकडे आणि डावीकडे साडे तेवीस अंशापर्यत जेव्हा हा सुर्य त्याचा भासमान भ्रमणात सुर्य विषवृतावर असतो .त्यादिवसी दिनमान आणि रात्रीचा कालावधी समान असतो . जो१२ १२तासांचा असतो वर्षातून असे दोन दिवस असतात ते म्हणजे 21 मार्च आणि 22...

11 सप्टेंबर

इमेज
वर्षातील काही तारखा अत्यंत विलक्षण असतात . त्यातलीच एक म्हणजे 11 सप्टेंबर .ही तारीख दोन कारणाने विलक्षण ठरते एक म्हणजे 11सप्टेंबर 1893 या दिवशी स्वामी विवेकानंद यांनी केलेले शिकागो येथे केलेले सुप्रसिध्द भाषण ज्यामुळे वैदीक संस्क्रुतीला एक वेगळी अशी ओळख जगभरात प्राप्त झाली . आणी दुसरी म्हणजे न्यूयॉक येथील वल्ड ट्रेड वरील हल्ला .दोन्ही घटना युनाटेड स्टेटस आॉफ अमेरीकेतील . दिवस ही सारखाच 11 सप्टेंबर . माञ एका घटनेने जगाला मानवतेचा महान संदेश दिला तर दुसर्या घटनेने कौर्याचा मानवास दु:खी करण्याचा संदेश दिला . कोणता योगायोग म्हणावे यास सुखद की दुखद . एका घटनेने पाश्चात्य देशांना पौवात्य देशातील ज्ञानचा अनूभव दिला तर दुसर्या घटनेने पौवात्य देशातील कौर्याचा अनुभव दिला . स्वामी विवेकानंद यांनी केलेल्या कार्यामुळे अनेकांना सुख शांती मिळाली तर दुसर्या घटनेने दैन दिले तारीख तीच 11 सप्टेंबर फक्त वर्ष बदलले एकाचे 1893 तर दूसर्याचे 2001 एक घटना अमेरीकेचा पुर्व किनार्यावर (शिकागो ) तर दुसरी पश्चीम किनार्यावर (न्यूयॉक ) एव्हढाच काय तो फरक .पण त्याचे किती वेगवेगळे परीणाम होतात असो स्वामी विवेकानंदांमु...