पोस्ट्स

फेब्रुवारी, २०१६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मराठी पाउल पडते कुठे ?

इमेज
कोणतीही गोष्ट जर वापरात नसेल तर कालांतराने ती गोष्ट बंद नष्ट होते ,अथवा बंद होते . पुर्वी मानवास शेपटी होती तिचा वापर न केल्याने ती झडुन गेली आणि त्याची निशाणी म्हणून निव्वळ माकडहाड राहिले . पोस्टाची एके काळची महत्वाची सेवा असलेल्या तारसेवेचा उपयोग कमी कमी होत गेला . परिणामी टपाल खात्याने तिलाच रामराम ठोकला . या पुर्वी जगात अनेक गोष्टी बंद झाल्या आहेत . त्यात अजून एका गोष्टीची भर पडणार का ? अशा प्रश्न आज मला एटिम मधून पैसे काढताना पडला त्यासाठीच आजचा हा पञप्रसंग त्याचे असे झाले की काहि कारणा निमित्याने पैसै काढण्यासाठी एटीम मध्ये गेलो असता मी कार्ड मशिनमध्ये घातल्यावर  भाषा म्हणून मराठि निवडली खरी माञ पुढे काहिच कार्यवाहि होइना त्या मशिनमध्ये फक्त दाखवायला मराठी भाषेचा पर्याय दिला होता माञ त्याचा पुढिल संगणकिय प्रोग्रामच लिहला नव्हता . कारण काय असेल त्याचे ? वापरणारेच नाहीत तर कशाला उगिच लिहायचा . हेच असणार ना त्या मागचे कारण . म्हणजेच त्या मशिन पुरती मराठी बंद , वापरा हिंदी अथवा इंग्रजी  . आपल्या मराठीत एक म्हण आहे थेंबे थेंबे तळे साचे . याचा अर्थ थोड थोड करतं गेल्यास ख...

याकडं बी ध्यान असू द्या !

गेल्या 2/3 दिवसातील महत्वाची पण मराठी माध्यमांतून काहीसी निसटलेली म्हणजे युनाटेड नेशन्स (हे माझ्यामते विशेष नाव आहे आणी विशेष नामाचे भाषांतर होत नाही त्यामुळे प्रचलीत असले तरी मराठी नाव वापरल नाही ) मध्ये सुरु असलेली परीषद ज्यामध्ये सिक्यूरिटी कौन्सिल मध्ये बदल घडवण्यासाठी चर्चा होणे अपेक्षीत आहे या बदलामध्ये भारत जपान जर्मनी आणी ब्राझील या जी 4 सदस्य राष्ट्रांना सिक्युरिटी कौन्सिल मध्ये पर्मनंट सिट विथ व्हेटो मिळण्याची शक्यता आहे . माञ या बाबत काही विशेष चर्चा आपल्या माध्यमात होताना दिसत नाहीये . असो जेव्हा याची अधिक्रुत घोषणा होइल तेव्हा होइलच . जगातील बहूसंख्य देश भारताकडे मोठ्या आशेने बघतात . जेव्हा आपण नामचे सक्रीय सदस्य होतो तेव्हा अनेक राष्ट्रे युनाटेड नेशन्समध्ये चर्चेला आलेल्या मुद्यावर भारताचा भुमिकेला सहजतेने पाठिंबा देत . भारताने नेहमीच शांतता सैन्यात महत्वाची भुमिका बजावली आहेच . तर सांगायचा मुद्दा अशा की त्यामुळे जगात भारताची प्रतिष्ठा वाढेल . काश्मीर सारख्या मुद्यावर ठोस भुमिका घेणे त्यामुळे शक्य होईल . माञ याला चीन काही प्रमाणात खोडा घालू शकतोस. भारताला हे तर पाकिस्तान...

मराठी भाषेची सुंदरता

इमेज
मराठी भाषेची सुंदरता 👌 खालील कवितेत २६ वेळा पाणी शब्द आला आहे व वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येकवेळी पाणी या शब्दाचे विविध अर्थ उलगडतात. ही आहे मराठी भाषेची श्रीमंती. मराठी राज्यभाषा झाली तर अशा समृद्धतेने नटलेल्या भाषेचे आपण पाईक होऊन समृद्ध संस्कृतीचे जोपासक होऊ. रंग पाण्याचे 'पाणी'शब्द हा असे प्रवाही वळवू तिकडे वळतो हा जशी भावना मनात असते रूप बदलते कसे पहा नयनामध्ये येते'पाणी' अश्रू तयाला म्हणती कधी सुखाचे,दुःखाचे कधी अशी तयांची महती चटकदार तो पदार्थ दिसता तोंडाला या'पाणी'सुटते खाता खाता ठसका लागून डोळ्यांतून मग 'पाणी' येते धनाढ्याघरी लक्ष्मी देवी म्हणती अविरत 'पाणी'भरते ताकदीहूनी वित्त खर्चिता डोक्यावरूनी 'पाणी'जाते वळणाचे 'पाणी' वळणावरती म्हण मराठी एक असे बारा गांवचे 'पाणी' प्याला चतुराई यातूनी दिसे लाथ मारूनी'पाणी'काढणे लक्षण हे तर कर्तृत्वाचे मेहनतीवर 'पाणी' पडणे चीज न होणे कष्टाचे उत्कर्ष दुज्याचा मनी डाचतो 'पाण्या'त पाहणे गुण खोटा 'पाणी'दार ते नेत्र सांगती विद्वत्तेचा गुण मोठा शिवरायांन...