पोस्ट्स

मार्च, २०१६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

भ फक्त आणि फक्त भाकरीचा भावनेचा कदापि नव्हे

इमेज
सध्या नागपुरी वडाभात खाणार्या काहि व्यक्तींच्या मतांमुळे मराठी जगत ढवळून निघत आहे . महाराष्ट्राच्या विभाजनासंबधी त्यांनी सांगितलेली मते काहि जणांना अप्रिय वाटत आहे . या प्रश्नाला  वाचा फोडणार्यांना अखेर त्यांना कार्यमुक्त व्हावे लागले . जे माझ्या मते अत्यंत अयोग्य आहे . माणसाला जगायला भाकरीच लागते भाव भावनांवर माणसाचे पालन पोषण माझ्या मते तरी शक्य नाहि . जर सद्यस्थितीत महाराष्ट्राचा विकास त्याचा मोठ्या  आकारामुळे होत नसेल तर त्याचे 2(विदर्भ +महाराष्ट्र ) /3(विदर्भ +मराठवाडा+ महाराष्ट्र )/4 किंवा काय पाहिजे तितके तूकडे करायला माझे समर्थन आहे . काहि लोकाच्या भावनेच्या पोटी जावून प्रदेशाचा  विकास जर थांबत असेल तर त्या भावनांना किंमत न देणेच योग्य ठरेल . मला महाराष्ट्रातील 108हूताम्यांविषयी पुरेपूर आदर आहेच . पण त्याचे भांडवल करत   एखाद्या प्रदेशाला अविकसीत म्हणून ठेवायला विरोध आहे . जर तूम्हाला महाराष्ट्र अखंडच ठेवायचा असेल तर हे प्रदेश मागे का राहिले याचा विचार करायलाच पाहिजे आणि त्यांना विकासाबाबत बरोबरीने आणणे आवश्यक आहे . जर हे शक्य नसेल तर वेगळे होण्यात ...

जागतिक वन दिवसाच्या निमित्याने

जागतिक वन दिवसाच्या निमित्याने सध्याच्या प्रचंड तापमानाच्या काळात आपणास एकच चर्चा ऐकू येते झाडे लावली पाहिजेत झाडे लावली पाहिजेत . झाडांमुळे पर्यावरणाचा समतोल टिकतो पर्यायाने हवेत गारवा टिकून रहातो ही या मागची कल्पना आहे . मानवास हे वृक्षांचे महत्व फार आधीच समजले होते . त्या अनूषंगाने मानवाने पाउले देखील टाकण्यास सुरवात केली होती . त्याचीच फलनिष्पती म्हणजे जागतिक वन दिवस . जो आपण 21 मार्च रोजी साजरा करतो . मानवी आयुष्यात वनांचे महत्व किती आहे हे आपणास तुकोबाराय आदी संताच्या अभंगातून लक्षात येतेच . संतांनी सांगितलेले हे  वृक्षांचे महत्व  आपण अनूभवू पण शकतो उदाहरणार्थ महाराष्ट्रातील महत्तवाची समजणारी जाणारी पुणे आणि नाशिक ही शहरं घेयुया  पुणे आणि नाशिक दोन्ही समान शहरे किंबहूना पुणे अधिक जलदचं या दोन्ही शहरातून फेरफटका मारल्यास आपणास काय जाणवते ? नाशकात आपणास अधिक उन जाणवते त्या तूलनेत पुण्यात उन कमी जाणवते  पुणे अधिक प्रमाणात  ग्रीन हाउस गँसेसचे उत्सर्जन करत असून देखील आपणास हा फरक जाणवतो  . याचा मागचा कारणाचा शोध घेतला असता आपणास दिसते की पुण्याच्या आ...

लोणार मी बघीतलेले

इमेज
लोणार मी बघीतलेले आजच  दिनांक 20मार्च 2016 पञ नव्हे स्मार्ट मिञ असे घोषवाक्य असणार्या एका दैनिकात लोणार विषयक लेखन वाचले अन माझे मन  लोणारला केलेल्या सहली आठवायला लागले. मी आतापर्यत 4 ते5 वेळा लोणारला गेलोय . दर वेळी लोणारला काही बदल झालेले दिसले काहि बदल सकारात्मक होते , काहि नकारात्मक होते असो मी इयत्ता आठवीत असताना सर्वप्रथम लोणारला गेलो . ते खगोल मंडळ या संस्थेमार्फत (ही पोस्ट वाचणार्रापैकी काहि लोकांना मी या संस्थेबरोबर सोमेश्वर धावत्या (धबधब्याचे छोटेरुप म्हणजे धावत्या  ) नाशिक  येथे केलेले आकाशदर्शन आठवू शकते ) नंतर परत एकदा याच संस्थेबरोबर गेलो . नंतर स्वतंञ ही गेलो . लोणारला प्रसिध्द असणार्या मुख्य सरोवराबरोबर गणेश तळे आणि अंबर तळे ही दोन छोटी सरोवरे देखील आहेत . त्याचा निर्मितीकाळ देखील मुख्य सरोवराच्या समकालीन आहे . तसेच प्रचंड मँगेंटीक पॉवर असलेली की ज्यामुळे चुंबकीय सुई देखील विचलीत होते अशी हनुमानाची उत्तर दक्षीण अशी झोपलेली मुर्ती पण लोणारचे आकर्षण आहे या मुर्तीला उभे करणे सोडाच पुर्व पश्चीम देखील कोणी करु शकत नाही भारतात  असणार्या काहि ...

उष्ण कोरड्या हवामानाचे भविष्य सामोरी

उष्ण कोरड्या हवामानाचे भविष्य सामोरी (जागतिक हवामान दिवसाच्या अनुषंगाने 23 मार्च ) सध्या सर्वांच्या तोंडी एकच वाक्य सदानकदाआपणास दिसते ते म्हणजे आमच्या लहानपाणी असे नव्हते आताचे हवामान खूपच लहरी झालंय कधीही पाउस कधिहि उन कधीही थंडी आणि तीही अतिशय कडक . सध्याचे हवामान फार झपाट्यान बदलतंय . तर या हवामानाचा अभ्यास केला जातो त्या शास्त्राला म्हणतात . "हवामान शास्त्र ' अथवा इंग्रजीत म्हणतात Meteorology /Climatology . . भुगोलाच्या ज्या दोन मुख्य शाखा मानल्या जातात प्राकृतिक भुगोल आणि मानवी भुगोल त्यातील प्राकृतिक भुगोल या मुख्य शाखेतील दुय्यम अभ्यास शाखा माञ सध्याच्या काळातील अत्यंत महत्तवाची अभ्यास शाखा म्हणजे हवामानशास्ञ होय . तर या हवामान शास्त्राची जगमान्य संस्था म्हणजे world meteorology organization ( www.wmo.int. ) ही होय . ही संस्था जगातील हवामानशास्ञातील संशोधनाची नोंद ठेवते . जगातील हवामानातिल बदलांची नोंद ठेवते . या संस्थेच्या ईसवी सन 1950 मध्ये भरलेल्या अधिवेशनात ठरल्याप्रमाणे 23 मार्च हा दिवस जागतिक हवामान दिवस म्हणून साजरा करण्यात येतो . हवामानशाशास्ञाची आणि मानवाच्...

विषवदिन विशेष

21 मार्चच्या अनुषंगाने समसमान आम्ही दोघे म्हणती दिन राञ पृथ्वी सुर्या भोवती फिरते  हे आता जगमान्य झाले आहे . याचा आपल्याला दिसणारे दृश्यपरिणाम म्हणजे आपल्याला दिसणारे सुर्याचा उदयाचे रोज बदणारे स्थान .  धोबळ मनाने आपण सूर्य पुर्वेला उगवतो असे मानतो पण शास्ञीय दृष्ट्या विचार केला असता वर्षातील फक्त दोन दिवस असे असतात ज्या दिवशी सुर्य वास्तविक पुर्व दिशेला उगवतो . अन्य दिवशी तो वास्तविक पुर्व दिशेपासून काहि अंश उजवीकडे अथवा डावीकडे उगवतो .ते दोन दिवस म्हणजे 21 मार्च आणि 22 सप्टेंबर .            सुर्याभोवती पृथ्वी फिरत असल्यामुळे आपणास सुर्यच फिरत  आहे असे वाटते .आपण त्यास सुर्याचे भासमान भ्रमण म्हणू या . तर हे सुर्याचे भासमान भ्रमण  होते  पृथ्वीवरच्या मध्यापासून अर्थात  विषवृतापासून उजवीकडे आणि डावीकडे साडे तेवीस अंशापर्यत जेव्हा हा सुर्य त्याचा भासमान भ्रमणात सुर्य विषवृतावर असतो .त्यादिवसी दिनमान आणि रात्रीचा कालावधी समान असतो . जो१२ १२तासांचा असतो वर्षातून असे दोन दिवस असतात ते म्हणजे 21 मार्च आणि 22...

गुरुदत्त 3 अंकी शोकांतिका

इमेज
पुस्तकाचे नाव - गुरुदत्त 3 अंकी शोकांतिका -लेखन - अरुण खोपकर -प्रकाशक -ग्रंथाली प्रकाशन मुल्य - 450 ₹ नुकतेच मी भारतीय चिञपट सृष्टीतील अत्यंत महत्तवाचे म्हणून ज्यांचे नाव घ्यावेच लागेल अश्या गुरुदत्त यांच्या जिवनावर आधारलेले  गुरुदत्त  3 अंकी शोकांतिका हे पुस्तक वाचले पुस्तक साहित्य अकादमीच्या 2016 चे पुरस्कार विजेते ज्येष्ठ सिने परीक्षक , कथालेखनकार भारतीय चिञपटसृष्टीघे जाणकार म्हणून भारताला परिचीत असणार्या श्री अरूण खोपकर यांनी लिहलेले  आहे  आणि ग्रंथाली प्रकाशनाने प्रकाशित केलेले आहे पुस्तकात गुरुदत्त यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत उहापोह न करता त्यांच्मा चिञपट निर्मितिच्या अंगाबाबत यामध्ये भाष्य केले आहे .  भाष्य करताना अन्य चिञपट निर्मात्याच्या अनुषंगाने गुरुदत्त कसे डावे अथवा उजवे ठरतात यावर सांगितलेले आहे . विषय कठिण असला तरी वापरलेली भाषा खुप सहज सोपी असल्याने पुस्तक रंजक झाले आहे . जे वाचतांना पहिल्यापासून पकड घेते                आणि म्हणूनच असेल कदाचित या मुळच्या मराठी पुस्तकाच...