पोस्ट्स

nashik base लेबलसह पोस्ट दाखवत आहे

ये आनंद तो गुजर चूका !

इमेज
राजेश खन्ना (ज्यांचा अंत फार वेदनादायक झाला )आणी अमिताभ बच्चन यांचा एक अजरामर जिवनाकडे नव्या द्रुष्टीने पहायला शिकवणारा चिञपट म्हणजे आनंद . या चिञपटाच्या अखेरीस अमिताभ बच्चन यांच्या तोंडी एक वाक्य आहे ." आनंद मरा नही ! आनंद मरते नही ! पण अमिताभ बच्चन यांना  वाईन कँपिटल आँफ इंडीया मध्ये आनंद या नावाशी साधम्य साधणारे चिञपट ग्रुह आहे . हे कदाचित माहीती नसावे . कारण ये पुलीस स्टेशन हे ! तुम्हारा बाप का घर नही असे ठणकावून सांगणार्या या अभिनेत्याने नाहीतर  हे सांगताना विचार  केला असता , की आपला आनंद अमर आहे पण जगातील सर्व आनंद अमर नाहीत . काही आनंद नावाशी साधम्य असणार्या चिञपटग्रुहाना  सरकारी अनास्थेमुळे अंतकाळ बघावा लागू शकतो . ज्यात नाशिकच्या विजयानद नावाच्या चिञपटग्रुहाचा पण समावेश आता होण्याची शक्यता आहे . याच विजयानंद मध्ये बालगंधर्व यांच्या नाटकाचा प्रयोग सूरू असताना औरंगाबाद उर्फ दाराशुकरोबाद उर्फ संभाजीनगर उर्फ खडकी या शहरातून आलेल्या एका अनंत कान्हेरे नावाच्या विशीतील तरुणाने तत्कालीन नाशिकचा जिल्हाधीकारी जँक्सन  जो स्वत: संस्क्रुत चा जाणकार होता त्याचा व...

बर झालं !

सर्वप्रथम केंद्रीय लोकसेवा आयोगाची नागरी सेवा परीक्षा देणार्या परीक्षार्थींना खुप खुप शुभेच्छा नाशकाच्या औद्योगीक क्षेञातील महत्वाची कंपनी असणार्या क्रॉम्पटन ग्रीव्हचा जवळपाश 100 दिवस चालणारा संप अखेर काही तडजोडी करत संपला . आणी गेले काही दिवस गँसवर असणार्या नाशिकच्या औद्योगिक क्षेञाने सुटकेचा विश्वास टाकला . नाशिकच्या अंबड या उपनगराच्या औद्योगीक क्षेञातील ही कंपनी नाशिकच्या औद्योगीक क्षेञातील महत्वाची कंपनी आहे . अंबड मध्ये या कंपनीवर आधारीत अनेक लघूउद्योग आहे . ज्यांना नाशिक महानगरपालिकेची फाळणी करण्याची मागणी आठवण असेल ,त्यांना हेही आठवत असेल की नाशिक महानगरपालिकेच्या आर्थीक स्ञोतासाठी अंबड किती महत्वाचे आहे . नाशिक महानगरपालीकेची आर्थीक स्थिती कशी आहे ? हे आपण साधू महंताचा ध्वजारोहणाच्या वेळी ऐकलेच , तसेच त्याला त्यावेळच्या सर्वात महत्वाचा राजकीय व्यक्तीने कशी वागणूक दिली हे ही आपण बघीतलेच . मला त्या राजकरणावर काहीही भाष्य करायचे नाही . मला आपले लक्ष वेधून घेयचे आहे ते हा संप मिटणे नाशिक महानगरपालीकेची आर्थीक स्थीती टिकण्यासाठी किती आवश्यक आहे याकडे . आणी हे उद्योग केवळ नाशिकला वा...