डाँ नरेद दाभोळकर आम्हाला माफ करा
डॉक्टर नरेंद्र दाभोळकर आम्हाला माफ करा . सर्वप्रथम रिपब्लीकन पक्षाचे धडाधडीचे नेते रा.सू . गवई यांना विनम्र श्रध्दांजली तिर्थस्वरुप डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांना साष्टांग नमस्कार डॉक्टर आम्हाला माफ करा . येत्या 20आॉगस्टला तुमच्या जाण्याला तब्बल दोन वर्षे होतील . माञ न्यायालयात खटला उभा राहणे तर दुरच आम्ही तुमच्या मारेकर्याना पण पकडु शकलो नाही . नाहि म्हणायला आम्ही काही संशयीतांची चौकशी केली . तुमच्या तत्वात न बसणारा प्लँचेट आदी प्रकार करून तुमच्या मारेकर्याला शोधण्याचा प्रयत्न केला .पण उपयोग शुन्य झाला. त्या बद्दल आम्हाला माफ करा . या वर्षी 19आॉगस्ट ला म्हणजे तुमच्या जाण्याला दोन वर्ष पुर्ण होण्याचा एक दिवस आधी नाशिकला साधू महंताचा सिहस्थ कुंभमेळ्याचे ध्वजारोहण होणार आहे .त्यामुळे हे शक्य आहे की समस्त मराठी माध्यमे कुंभमेळ्याचा रंगात रंगून जातील . मग कदाचित तुमच्या बातमीकडे दुर्लक्ष पण होवू शकते त्या बद्दल आताच माफ करा . कदाचित पुण्याचे स्थानिक वर्तमानपञ याची दखल घेतीलही .हिंदुत्वाचा कैवार असलेले लोक आता सत्तेत आहेत . माञ प्रखर हिदुत्ववादी असणार्या स्वातंञ्यवीर सावरकरांचा विज्ञानवादी द...