उष्ण कोरड्या हवामानाचे भविष्य सामोरी
उष्ण कोरड्या हवामानाचे भविष्य सामोरी
(जागतिक हवामान दिवसाच्या अनुषंगाने 23 मार्च )
सध्या सर्वांच्या तोंडी एकच वाक्य सदानकदाआपणास दिसते ते म्हणजे आमच्या लहानपाणी असे नव्हते आताचे हवामान खूपच लहरी झालंय कधीही पाउस कधिहि उन कधीही थंडी आणि तीही अतिशय कडक . सध्याचे हवामान फार झपाट्यान बदलतंय . तर या हवामानाचा अभ्यास केला जातो त्या शास्त्राला म्हणतात . "हवामान शास्त्र ' अथवा इंग्रजीत म्हणतात Meteorology /Climatology . . भुगोलाच्या ज्या दोन मुख्य शाखा मानल्या जातात प्राकृतिक भुगोल आणि मानवी भुगोल त्यातील प्राकृतिक भुगोल या मुख्य शाखेतील दुय्यम अभ्यास शाखा माञ सध्याच्या काळातील अत्यंत महत्तवाची अभ्यास शाखा म्हणजे हवामानशास्ञ होय . तर या हवामान शास्त्राची जगमान्य संस्था म्हणजे world meteorology organization (www.wmo.int.) ही होय . ही संस्था जगातील हवामानशास्ञातील संशोधनाची नोंद ठेवते . जगातील हवामानातिल बदलांची नोंद ठेवते .
या संस्थेच्या ईसवी सन 1950 मध्ये भरलेल्या अधिवेशनात ठरल्याप्रमाणे 23 मार्च हा दिवस जागतिक हवामान दिवस म्हणून साजरा करण्यात येतो . हवामानशाशास्ञाची आणि मानवाच्या भविष्यात वाढून ठेवलेल्या धोक्याची जाणिव करून देण्यासाठी योजलेला दिवस म्हणजे जागतिक हवामानशास्ञ दिवस. हा दिवस दरवर्षी विविध संकल्पना राबवून साजरा करण्यात येतो .
इसवी सन 2016 सालची संकल्पना आहे . "उष्ण कोरड्या हवामानास सामोरे जाताना ." (HOTTEE DRIED WETTER FACE THE FUTURE )
सध्या जगात तापमान वाढत आहे . इसवी सन 2000 पासून प्रत्येक वर्ष मागच्या वर्षापेक्षा अधीक उष्ण आहेत . सध्याचे 2016 चे आतापर्यतचे हवामान बघता ती परंपरा या वर्षी पण चालू राहणार असेच वाटते . सध्या म्हणजेच मार्चचा मध्यातच एकेकाळी थंड हवेचे ठिकाण म्हणून सुविख्यात असणार्या नाशिकचे तापमान पस्तीस अंशाच्या आतबाहेर आहे . तापमान वाढले की हवेतील बाष्पाचे प्रमाण कमी होवून हवेतील कोरडेपणा वाढतो . त्यामुळे सध्याचे हवामान बघता दिवसोंदिवस हवेतील कोरडा पणा वाढत आहे . हवेतील बाष्प कमी झाले की त्याचा पर्जन्यमानावर विपरीत परिणाम होतो . त्याचे प्रमाण कमी कमी होत जाते . या धोक्याकडे मानवी समुहाचे लक्ष्य वेधून घेण्यासाठी या वर्षभरात कार्यक्रम योजले जाणार आहेत .
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा