आउटसोर्स आणी आपण
सर्वप्रथम मध्यप्रदेश मधील रेल्वे अपघात आणी 5आॉगस्टला मुंबईत स्वाईन फ्ल्यू ने म्रुत्युमुखी पडलेल्या अनूक्रमे 28 आणी 2 जणांना भावपुर्ण श्रध्दांजली
5 आॉगस्टला मी मिञांबरोबर कटट्यावर बसलो असता त्यावेळी अनूपस्थित असणार्या एका मिञाचा विषय निघाला .त्यावेळेस आमच्यातील एक जण सहज म्हणाला " बसला असेल तो स्काईपवर त्या परदेशातील लोकांना बुध्दीबळ शिकवत त्याचा साठी स्काईप महत्वाचे आपण नाही .त्याच वेळी रस्त्यावर एक दुचाकी घसरल्याने तो विषय बारगळला पण या तंञज्ञानाने शिकण्याचा संकल्पना किती बदलल्या . शिक्षक आणी विद्यार्थी एकमेकांसी किती तरी दुर असले तरी एकमेकांशी सहजतेने संवाद करत शिकू शकतात . टिमव्हीवर सारख्या गोष्टीची त्याला जोड दिल्यास अजूनच ऊत्तम ! आपल्या संगणकातील माहीती ही सहजतेने दुसर्याला देता येते . आणी हे विद्यार्थी जर परदेशी असतील तर आपल्या भारतीय चलनातील शिकवणी त्यांना स्वस्तच पडते आणी आपलाही फायदा होतो . आपल्याला शिकवायला घर सोडून अन्यञ कुठे जावू शकत नाही . घर बसल्या बसल्या आपणास ज्ञानद्यानाचे कार्य करता येते . आपल्या संस्क्रुतीत ज्ञानदान हे प्रचंड पुण्य देणारे काम आहे असे सांगीतले आहे . जे आपले सहजतेने होते . कसल्याहि स्वच्छ अस्वच्छ किंवा शांत गर्दीचा ठिकाणी पाण्यात डुबकी मारावी लागत नाही . तर सांगायचा मुद्दा अशा की सध्या समाज माध्यमांविषयी (social media)खुप काही बरे वाईट बोलले जात आहे अश्या प्रसगी हे ही लक्षात घेणे आवश्यक आहू की समाज माध्यमे निव्वळ मनोरंजनाचे कार्य करत नाहीत तर आर्थीक सुबत्ताही आणून देवू शकतात . माझा मिञ जरी या नवमाध्यमाचा (New media) चा वापर करत बुध्दीबळ शिकवत असला तरी गणितासारखे विषय ही या माध्यमातून शिकवले जावू शकतात असे मला वाटते . असो ही अल्लाउदिन च्या जीनची ताकद आहे ती कशि वापरायची हे ज्याचे तोच योग्य पध्दतीने ठरवु शकतो ना ? सुदैवाने आपल्या सर्वाना तो जादुई चिराग प्राप्त झालाय . या माध्यमातून शिकवणे फारशे कष्टप्राय नाही . हे मी त्या मिञाच्या निरीक्षणावरुन सागू शकतो . माञ या साठी जर आपण पाश्चात्य देशातील विद्यार्थी घेतले तर आपणास त्या देशातील जेव्हा कामाची वेळ असेल त्या प्रचाशी सहजता साधणारी जिवन शैली आपणास स्विकारावी लागते . आपल्या भारतात आंतरजालाचा (Internet)चा दिवसोंदिवस वेग वाढत आहे . त्यामुळे अश्या पध्दतीने शिकण्यास वाव आहे . सध्या अश्या प्रकारे शिक्षण देणारी काही संकेतस्थळे आहेत माञ त्याचा पेक्षा स्वता:च अश्या पध्दतीने शिक्षण देणे योग्य असे मला वाटते अर्थात सुरवातीला त्याचा वापर करणे योग्य आहे या विषयी खुप काही बोलता येवू शकते माञ सध्या थांबतो .पुन्हा भेटण्यासाठी तो पर्यत रामराम
आपला अजिंक्य तरटे
ताजा कलम आताच मी टिव्हीवर बातमी बघीतली की देशात आतापर्यत सर्वात कमी पाउस आपल्या मराठवाड्यात झालाय .तेव्हा पाणी जपून वापरा . त्यातही नाशिक लोकसभा मतदार संघातील आणी शिर्डी लोकसभा मतदार संघातील लोकांनी तर अधिकच जपून पाणी वापरल पाहीजे कारण वेळ पडलीच तर येथूनच पाणी मराठावाड्यातील सर्वाधीक भागाला देता येवू शकते . क्रुष्णा खोर्यातून जेमतेम लातूर उस्मानाबाद बीड या जिल्ह्यातील तहान भागवता येइल . बाकी ओरंगाबाद जालना परभणी हिंगोली नांदेडसाठी गोदामाईच उपयोगी पडणार आहे
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा