माहिती तंज्ञज्ञान आणी मी
सर्वप्रथम 3 जून 1984 ला झ्लेल्या आॉपरेशन ब्ल्यू स्टार मध्ये महत्वाची भुमिका बजावणारे जनरल अरूण कुमार वैद्य यांच्या स्मुतीस ञिवार वंदन 10आॉगस्ट 1986 ला त्याची पुण्यात हत्या झाली होती आणी मराठी भाषेला म्हण देणारी अटकेपार झेंडे लावण्याची घटना 10आॉगस्टलाच घडली होती त्या निमित्याने सर्व मराठी जणांचे अभिनंदन
तर सध्याचा काळात अत्यंत जलद गतीने बदलणारी कोणती गोष्ट असेल तर ती म्हणजे माहिती तंञज्ञान क्षेञातील बदल होय या न त्या कारणाने आपण सर्वच त्याच्याशी जोडलो गेलो आहोत . आपणास आवडो अगर नावडो पटो अथवा ना पटो आपणास या माहिती तंञज्ञानाचा स्विकार करणे आवश्यक आहे याची पाउले मागे फिरवणे कोणासही शक्य नाही . नरेंद्र मोदी यांच्य् संकल्पनेतून साकारलेली डिजीटल लॉकरची संकल्पना असो अथवा काहि संकेतस्थळांवर बंदी घालण्याचे सरकारने ठरवलेले धोरण असो किंवा प्रस्तावीत असणारे माहिती तंत्रज्ञान कायद्यातील बदल असो , नाहितरी नेट न्युट्रालीटी बाबतचे आंदोलन असो ही सर्व गेल्या काही काळातील आपले जीवन यामुळे कसे व्यापुन गेले आहे याची उदाहरणे आहेत . आपल्या भारतीय कायदेप्रणाली नूसार मल् हा कायदा माहिती नव्हता जर माहिती नसता तर अश्या प्रकारचा अपराध माझ्याकडुन घडलाच नसता हा गून्ह्याचा बचाव्यासाठी मुद्दा ठरत नाही आणी आपल्याकडे कोणत्याही कारणामुळे व्यक्ती आत गेल्यास त्याकडे बघण्याचा समाजाचा द्रूष्टीकोन बदलतो . समाज त्या व्यक्तीला वाळीतच टाकतो . तरी आपणाकडून चूक होवू नये म्हणून आपणास कायदा माहिती असणे अत्यावशक आहे . पुण्याचा चाणक्य मंडल तर्फे प्रकाशीत होणार्या स्वतंञ्य नागरीक या साप्ताहीकात कायद्याची सहज सोप्या पध्दतीने माहीती देण्यात येते जे खरोखरच वाखण्याजोगे आहे .नाहीतर कायद्याची भाषा म्हणजे अतिशय बोजड असणारी भाषा असते .अर्थात हे माझे मत आहे ज्याप्रमाणे हाताची पाची बोटे सारखी नसतात त्या नुसार तुमचे मत याबाबत भिन्न असू शकते ज्याचे मी स्वागतच करतो .असो मागे एका मराठी व्रुत वाहिनीवर अश्याच एका गुन्ह्यात तरुणाला सात वर्षाची तुरूंगवासाची शिक्षा झाल्याची दुर्दैवी बातमी दाखवली होती . आॉनलाइन कॉपीराइटचा भंग करण्याचा गुन्हा त्याचा कडुन घडला होता . म्हणजेच सांगायचा मुद्दा असा की निव्वळ व्यक्तीची बदनामी केली अथवा त्यास आर्थीक बाबत फसवले तसेच समाजात तेढ निर्माण होइल अशी विधाने केली म्हणजेच माहीती तंञज्ञानाचा बाबतीत गुन्हा घडतो अशे नाही त्यामुळे या बाबत सतर्क राहणे अत्यावशक आहे . आपल्याकडे या बाबतची व्याखाने अधिक मोठ्या प्रमाणात आयोजीत करण्यात यावी असे मला वाटते अर्थात हे माझे मत अहे आपले मत भिन्न असू शकते . मराठीत या बाबत काही पुस्तके मी बघीतली आहेत ती मुख्यत: आपली फसवणूक होउ नये या अनुषंगाने लिहली गेली आहेत . अर्थात माझे निरीक्षण परीपुर्ण आहे अशा माझा दावा नाही . किबहूना माझे निरीक्षण चुकीचेच आहे असे समजले तरी चालेल . माञ मी केलेल्या निरीक्षणात आॉनलाईन कॉपीराईट आदी विषयावर फारशे लिहलेले आढळत नाही . या विषयावर तज्ञांनी प्रकाश टाकावा ही विनंती . याची व्याप्ति प्रचंड आहे माञ तूर्तास थांबतो . ते पुन्हा भेटण्यासाठी तो पर्यत रामराम
आपला अजिंक्य तरटे
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा