सुक्षीतांचा अडाणीपणा

दिव्य मराठीच्या पञकार प्रियंका डहाळे यांच्या आत्म्यास शांती लाभो ओम शांती शांती शांती
सुशिक्षीतांचा अडाणीपणा
नाशकातील ही गोष्ट असली तरी पळसाला पाने तीनच या म्हणीप्रमाने आपण ही गोष्ट कोणत्याही भारतातील ठिकाणी लावू शकतो याची खात्री बागळ्यास हरकत नसावी असी ही गोष्ट आहे
तर एका संध्याकाळी मी माझ्या मिञांबरोबर नाशिक च्या मेन रोड वर सायंकाळच्या सुमारास चाललो होतो (मी ज्याठिकाणाहून चाललो होतो ती मार्केट प्लेस आहे आणी जूनी असल्याने अर्थातच अरुंद आहे गर्दीचा वेळी पायी चालण देखील ञासदायक होण्याची ती जागा आहे )अचानक एक लांबट कार कर्णकर्कश हॉन वाजवत जावू लागली ती कार जवळून जाताना आम्ही सहज कारमध्ये डोकावले तर कारमध्ये फक्त दोन डोकी होती त्याचा एकंदरीत दिसण्यावरून ती बडी असामी वाटत होती याला सुशिक्षितप णा म्हणायचा का ? गर्दीचा ठिकाणी जिथे जेमतेम टु व्हीलर जाईल तिथे समस्त समाजाला त्रास होइल असे वागणे कोणत्या सुशिक्षितपणाचा व्याखेत बसते माझा तरी अशा अनुभव आहे की तथतकीत गावंढळ समजले जाणारे लोकच अधीक सुशिक्षित असतात माणूसकी असणारे लोक असतात तर सोकॉल्ड
लई भारी वर्ग अशिक्षित असावेत असेच वागणारे असतात माणुसकी नसणारे असतात अर्थात माझे अनुभव विश्व परिपुर्ण आहे अशा माझा दावा नाही हायक्लास मध्ये सुध्दा चांगले लोक असे शकतात प्रत्येक सामाजिक शास्त्राचा नियमाला अपवाद असतातच माञमतदान यादीत नाव नसण्यार्या व्यक्तीची जर यादी केली तर या वर्गातील व्यक्तीच जास्त आढळतात मँनर्सचा नावाखाली ताटात अन्न टाकूण देणे असे प्रकार करतात आपल्या देशात जिथे हजारो लोक उपाशी असतात तिथे असे वाग णे योग्य आहे का ?मी माझ्या स्वत: मुंजीत गरीब लोकांना खरकटे खातान् बघितले आहे अश्या लोकांविषयी या उच्चभू लोकांचा द्रुष्टीकोन फारच तिरस्कासयुक्त असतो मी माझा पदवीपश्चात शिक्षणात झोपडपट्टीचे जीवन जवळून बघितले आहे त्यांचा कष्टाविषयी या समाजाला काहीही माहीती नसते याविषयी खुप काही बोलण्यासारखे आहे पण तुर्तास थांबतो पुन्हा भेटण्यासाठी तो पर्यत बाय टेक केअर

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अजून किती वीर बापू गायधनी

जागतिक कृषी पर्यटन दिना निमित्य

जाने क्यू ?