मानसिक आरोग्य एक दृलक्षीत घटक

मानसिक आरोग्य एक दृलाक्षित घटक
सध्याच्या काळातील अत्यंत ज्वलंत विषय म्हणजे मानसिक आरोग्य हा होय .सध्याच्या अत्यंत ताण तणावाच्या काळात ज्या कोणत्या प्रकारच्या विकाराने सर्वाधिक लोक पिडीत असतील तर ते आहेत विविध मानसिक रोग . मी विविध हा शब्द वापरतोय . हे लक्षात घ्या , कारण सर्वसाधारणपणे मानसिक रोग म्हंटले की फक्त छिन्नमानसिकता ( स्कीझोफेनिया ) हाच रोग लोकांच्या नजरेस येतो . बाकीचे काही रोग हे मानसिक रोग आहेत हेच त्यांचा लक्षात येत नाही. अनेक मानसिक समस्या या विक्षिप्त स्वभाव या सदराखाली झाकल्या जातात ज्याच्यावर उपचार केल्यास त्या सहज बऱ्या होऊ शकणाऱ्या असतात
मानसिक आरोग्याबाबत लोकांच्या  गैरसमज म्हणजे समुपदेशक (consular ) आणि मनोसोपचार तज्ञ यात होणारी लोकांची गलत . लोकानां दोघांतील फरकच सहज माहिती नसतो . लोक दोघाना एकेच समजतात .मानसोपचार तज्ञ हे एम बी बी एस + एम दि सायको हे क्षिक्षण झालेले असतात .आणि वैद्यकीय औषध तेच देवू शकतात समुपदेशकांना औषधाबाबत काहीच अधिकार नसतात
तर समुपदेशक समुपदेशनाच्या कोर्स झालेले असतात मुख्यत: हा कोर्स एम ए मानाशात्र झालेले करतात
मानसिक रोगांच्या बाबतीत एक सार्वञिक आढळणारा गैर समज म्हणजे शॉक देणे . फारच अपवादात्मक स्थितीत त्याचा वापर करावा लागतो . आणि त्याचे पण नियम आहेत . 27 पेक्षा अधिक शॉक एखाद्या व्यक्तीस देता येत नाहीत जर एखाद्या डॉक्टर ने ते दिले तर त्यावर फौजदारी होऊ शकते. शॉक घेणार्या व्यक्तीचे आपल्या भारतातील स्थितीमुळे फारच हाल होतात . शॉक घेण्या आगोदर त्या व्यक्तीने 12 तास आधि काहि खायचे अगर प्यायचे नसते आपल्या भारतातील उशीरा काम करण्याचा पध्दतीमुळे अश्या रुग्णाना 20 तासापर्यत ञास  सहन करावा लागतो . हे चिञ बदलायाच हवे
मानसिक रुग्णाबाबत समाजाचा दृष्टीकोनदेखील फारशा चांगला नाही अश्या व्यक्तीना आधाराची गरज असते . माञ अशी व्सक्ती जवळ आली की डोक्याला बोट लावून गोल गोल फिरवणे तूला शॉक दिला का असे विचारुन अश्या व्यक्तीचा आत्मविश्वास तोडला जातो . परिणामी ती समाजापासून दूर दूर जायला लागते आणि त्या व्यक्तीचा आजार अधिक बळावतो .अर्थात या चिञात आता बदल होत आहे .
आपला अजिंक्य तरटे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अजून किती वीर बापू गायधनी

जागतिक कृषी पर्यटन दिना निमित्य

जाने क्यू ?