दुसरी बाजू

सध्या नाशकात सर्वञ कुंभमेळ्याचीच चर्चा सुरु आहे . जे योग्य ही आहे . बारा वर्षांनी येणारा मोठा उत्सव आहे हा .तो मोठ्या प्रमाणात साजरा केला गेलाच पाहिजे यात वादच नाही . माञ त्या वेळेस सुध्दा आपली नजर भविष्याकडे असली पाहिजे . आज नाशकातील मोठ्या धूमधडाक्यात सुरु झालेले ग्रुह निर्माण प्रकल्प अडचणीत सापडले आहेत. ते भविष्यात मोठ्या समस्या निर्माण करू शकतात . घरांच्या किमती वाढल्यामुळे तेथील अनेक सदनिका विकल्या गेलेल्या नाहीत . या रिकाम्या पडलेल्या सदनिका भविष्यात येणार्या आर्थिक मंदीची तर चाहूल देत नाहीना ? याचा विचार करण्याची वेळ जवळ येत चालली आहे . एल बी टी अंशत: रद्द झाल्याने( एल बी टी सरसकट रद्द न होता विहीत रकक्मेपेक्षा अधिक उलाढाल असणार्याना असल्याने अंशत:) आता उत्पनाचा मुख्य स्ञोत खरेदी व्रिकी आहे तिथे अशी स्थिती असेल तर बघा सटवीच्या मनात काय काय योजना आहेत ? आधीच दुष्काळामुळे शेती फारशी उत्पन देणारी राहिलेली नाही . औद्योगिक क्षेञातही मन प्रसन्न ठेवणारी स्थिती आहे असे मला तरी वाटत नाही . नाशिक च्या सातपूर आणी अंबड या उपनगरातील औद्योगीक वसाहतीत नूसता फेरफटका मारला तरी परीस्थितीचा अंदाज येवू शकतो . अर्थात नाशिक शिवाय अन्यञ जसे पिंपरी चिचवड औरगाबाद सारख्या ठिकाणची औद्योगीक स्थीती मला माहिती नाही ती उत्तम असावी आशा धरूया . मला बीबीसी च्या क्रुपेने अशी माहिती मिळत आहे की जगात सरकारी दौरे वाढले आहेत मग तो आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी असो सुषमा स्वराज असो किंवा जर्मनीचा चांन्सलर अँजीना मँकेल असो . आणी यातील बहूतेक दौरे अन्य देशात आपली गुंतवणूक गुंतवणूक व्हावी किंवा अन्य देशाने आपल्या देशात गुंतवणुक करावी या उद्देशाने होत आहे . कोणत्याच सरकारला आपली गुंतवणूक आपल्याच देशात व्हावी , स्वदेशी कारखांनदारांनी स्वदेशातच गुंतवणूक करावी असे का वाटत नाही ? असो तर सांगायचा मुद्दा अशा की गुरुवारी संपलेला क्रॉप्टन चा संप ही एक चांगली घटना सोडली तर फारशे चांगले वातावरण नाहीये मग ते आर्थीक वातावरण असो अथवा भौगोलीक वातावरण ,अर्थात नाशकातील . माञ कुंभमेळ्यामुळे अध्यात्मीक वातावरण माञ सर्वोत्तम आहे . त्याचा आर्थीक जगतला प्रचंड फायदा होउन हे संकट टळावे हीच या मंगल प्रसंगी प्रार्थना

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अजून किती वीर बापू गायधनी

जागतिक कृषी पर्यटन दिना निमित्य

जाने क्यू ?