आय पि एल
िमीयल लीग अर्थात आय पी एल मध्ये दोन क्रिकेटचे संघ 2वर्षासाठी रद्द करण्यात आले या आय पी एल मध्ये काय चालते हे मी स्वत: अनभुवलेले आहे पुण्याचा संघाचे लोकापर्ण झाले ते पुण्याचा सर परशुराम भाऊ महाविद्यालयाचा मैदानात जे महाविद्यालयाचा विद्यार्थांचा वसतीग्रुहाला अगदी लागून आहे त्या वेळी मी या महाविद्यालयातील वसतीग्रुहात राहुन शिकत होतो तर सांगायचा मुद्दा अशा की त्या उद्घाटन समारंभात मला खुप सहजरीत्या समजले की आय पी एल काय गोष्ट आहे (तसे असे अनेक कार्यक्रम या मैदानावर झाले जसे शंकर महादेवन लता मंगेशकर अश्या विविध गायकांचे कार्यक्रम ज्याचे किमान 400 रुपयांचे तिकीट असायचे सध्या शिक्षण प्रसारक मंडळी मध्ये आर्थीक घोटाळा झाल्याचा आरोप केला जातोय त्याचा अंदाज यामुळे येवू शकतो ) या आय पी एल मध्ये खेळाडू बाद झाल्यावर किंवा खेळाडूने षटकार चौकार मारल्यावर होणारे न्रूत्य आणी त्यावर होणारे आरोप किंवा होणारे सट्टेबाजाचे आरोप तसेच त्याचे प्रक्षेपण करायचे हक्क देण्याबाबतचे विविध आरोप प्रत्यारोप प्रायोजक्तवाचे हक्क सर्वच आध्यात्माचा भाषेत विष समजलेल्या गोष्टी भोवती फिरणारे कोची टस्कर संघातील मालकांचा आपसातील वाद त्यातील एका मालकाचा दिल्लीतील हॉटेलमध्ये संशयास्पद म्रुत्यु सारेच या म्रुत्यू लोकातील माया भोवती फिरणारे अर्थात संशयास्पद आहे पुण्यात या आय पी एल साठी यशवंतराव चव्हाण द्रूतगती महामार्गावर स्वतंञ्य रित्या क्रिडा संकुलाची उभारणी झाली आहे बालेवाडी मधील क्रीडा संकुलाविषयी खुप वेळा बहूतेक प्रसंगी नकारात्मक समजते मग ते कोणाचे लग्न असो किंवा अन्य कोणतेही ते सहजा नकारात्मक असते माञ या खास क्रिकेटसाठी उभारलेल्या क्रिडा संकुलासाठी काहीच बोलले जात नाहीये त्याचा वापर कशासाठी होतो ? यावर एखादा जण विद्यावाचस्पती ही पदवी पण कदाचित प्राप्त करु शकतो असो या इंडीयन प्रिमीयल लीग च्या आधी इंडीयन क्रिकेट लीग नावाचा एक अयस्ववी प्रयत्न झाला होता किंवा 1975 साली आँस्टोलीयात पिटर नावाच्या एका व्यक्तीने अशा प्रयत्न केला होता तर सांगायचा मुद्दा असा की आय पी एल मधील सर्व वादगस्त प्रकारणाचा एकञीत तपास करावा श्रीसंत तसेच यापुर्वी अन्य दोषी ठरवलेल्या खेळाडुंची पण नव्याने चौकशी करण्यात यावी पण या आय पी एल ने अनेक चागल्या गोष्टीना पण जन्म दिला हे माञ विसरता येणार नाही आय पी एल यशस्वी झाल्यावरच आय पी एल सारख्या अन्य खेळाच्या लीग सूरू झाल्या उदाहरणार्थ बुध्दीबळ हॉकी फुटबॉल किंवा 18जूलै पासून सूरू होत असणारी कबड्डी ची लीग स्पर्धा याचे जनकत्व आय पी एल ला देणे हे अत्यावशक आहे किंवा तो आय पी एल चा मुलभुत अधिकार आहे असे म्हटले तर वावगे ठरू नये तसेच यामुळे ठराविक शहरापुरता मर्यादित असणारा खेळाडुंचा सहभाग हा प्रचंड वाढला क्रिकेट हा खेळ खर्या अर्थाने भारतभर पसरला हे त्याचे यश मानायलाच हवे अर्थात या विषयी खुप काही बोलता येवू शकते माञ तुर्तास थाबतो तुम्ही माझ्या पोस्टची वेळ बघत असालाच तर थांबतो पुन्हा भेटण्यासाठी तो पर्यत रामराम
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा